मेस व हाॅस्टेल चालकांच्या धंद्यात मंदी; सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यी गावी गेल्याने व्यवसायावर परिणाम !

Foto

औरंगाबाद :  शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. याबरोबरच शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधा व नानाविध अभ्यासक्रमांचे नामांकित महाविद्यालये यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी औरंगाबादकडेच कल राहिला आहे. पुण्या-मुंबई च्या तुलनेत औरंगाबादेत रूम करून अथवा हाॅस्टेलवर राहणे विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी औरंगाबाद हेच त्यांचे शैक्षणिक हब बनले आहे. मात्र, विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परिक्षा आता संपल्या असुन बहुतांश विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्याने ते आपापल्या गावी गेले आहेत. याचा फटका औरंगाबाद मधील मेसचालक व हाॅस्टेल चालकांना बसत आहे. मेसवर जेवणार्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली असुन शहरातील हाॅस्टेलदेखील सुनसान झाले आहेत. याचा मोठा आर्थिक भुर्दंड या व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे.

औरंगाबादमध्ये बाहेरगावहुन शिकण्यासाठी  येणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या विद्यार्थ्यांवर अवलंबून असणार्या प्रत्येक घटकावर याचे परिणाम झालेले पहायवयास मिळत आहेत. रूम भाड्याने देणारे घरमालक, अभ्यासिका चालवणारे, मेस, चहा-नाष्टा सेंटर इत्यादी इत्यादी व्ययसायिकांच्या व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला आहे. रूम भाड्याने घेऊन राहणार्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील लक्षणीय असते. मात्र, विद्यार्थीच शहरात नसल्याने शहरात जागोजागी 'रूम भाड्याने मिळेल' अशा सूचनांचे फलक लागलेले दिसतात. तर एरवी चहा नाष्टयांच्या दुकानांवर दिसणारी गर्दीदेखील आता विरळ झाली आहे. याचा मोठा फटका या व्यावसायिकांना बसत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

काॅलेज सुरू असताना आमच्याकडे जवळपास पाचशे विद्यार्थ्यांची मेस होती. आता केवळ दोनशे मेंबर आहेत. मुलांना सुट्ट्या लागल्याने ते गावी गेले आहेत. याचा परिणाम आमच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
- शिवप्रसाद रत्नपारखे
संचालक एमजीएम स्पोर्ट कॅन्टीन